वर्णन
🏰शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम -
आपला मावळा संघटना आणि लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली चावंड किल्ला, ता. जुन्नर, जि. पुणे येथे शिवकालीन गडकोटांची स्वच्छता, संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि इतिहास जतनासाठी एक सशक्त मोहीम आयोजित करण्यात येत आहे.
📅 मोहीमेचा दिवस
- रविवार, 27 सप्टेंबर 2026
- वेळ: सकाळी 07.00 वाजता
- स्थळ: चावंड किल्ला, ता. जुन्नर, जि. पुणे
मुक्कामाचे ठिकाण- जि.प.प्रा. शाळा चावंड, ता. जुन्नर, जि. पुणे
लोकेशन
🗓️ नोंदणीची अंतिम तारीख
- 25 सप्टेंबर 2026, रात्री 11.59 पर्यंत
🌐 नोंदणी लिंक 👉 https://aaplamavla.com/campaign/chavand
📞 संपर्क क्रमांक (नोंदणीसंबंधी अडचण असल्यास)
🏕 बस व्यवस्था व सूचना
- नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी मोहीमेच्या दिवशी सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण उपलब्ध राहील.
- प्रवासादरम्यान पाण्याची बाटली व हलके स्नॅक सोबत ठेवावे. तसेच 26 सप्टेंबर रोजीचा एक वेळचा आवश्यक जेवणाचा डब्बा सोबत घ्यावा.
- अहिल्यानगर व पारनेर शहरातून येणाऱ्यांसाठी बस व्यवस्था करण्यात आलेली आहे.
- बस दिनांक 26 सप्टेंबर 2026 सायंकाळी 05.00 वाजता पारनेर व नगर ऑफिस येथून निघतील.
- प्रवासाचा मार्ग: अहिल्यानगर → पारनेर (कान्हुर मार्गे) → टाकळी ढोकेश्वर → कर्जुले हर्या → आणे → बेल्हे → नारायणगाव → जुन्नर → आपटले → चावंड किल्ला
- प्रवास व मुक्कामाचे नियोजन लक्षात घेऊन फक्त नोंदणी केलेल्यांनाच बसमध्ये प्रवेश मिळेल.
- मुक्कामी येणाऱ्या स्वयंसेवकांनी ब्लँकेट/चादर सोबत आणावी. पर्जन्य परिस्थितीमुळे रेनकोट/छत्री आणणे आवश्यक आहे.
- टी-शर्ट मिळालेल्यांनी तो परिधान करून यावे; इतरांसाठी अल्पदरात टी-शर्ट उपलब्ध राहतील.
- हवामानातील बदल लक्षात घेऊन योग्य कपडे व शूज परिधान करावेत.
- गडावरील उघड्या कड्यांवर किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.
- प्रवासादरम्यान आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यावी; तब्येत बिघडू नये याची दक्षता घ्यावी.
- लहान मुलांना (18 वर्षांखालील) पालकांशिवाय प्रवासाची परवानगी मिळणार नाही.
- मोहिमेच्या दिवशी www.aaplamavla.com वर लॉगिन करून Check-In करणे आवश्यक आहे.
📝 नोंदणी प्रक्रिया पूर्वी नोंदणी केलेल्यांसाठी:
- लिंकवर क्लिक करा → “आता नाव नोंदवा”
- मोबाईल नंबर व OTP टाका
- लॉगिन करून विचारलेल्या प्रश्नांचे अचूक पर्याय निवडा
- “सबमिट” करा
- नोंदणी यशस्वी झाल्यावर WhatsApp संदेश प्राप्त होईल
- “अधिक जाणून घ्या” वर क्लिक करून मोहिमेची माहिती मिळवा
नवीन नोंदणीसाठी:
- लिंकवर क्लिक करा → “आता नाव नोंदवा” → “नोंदणी करा”
- फॉर्म भरून “OTP पाठवा” वर क्लिक करा
- प्रोफाइल तयार झाल्यावर पुन्हा लिंकवर जाऊन “आता नाव नोंदवा” निवडा
- विचारलेल्या प्रश्नांचे पर्याय निवडा व “सबमिट” करा
- नोंदणी यशस्वी झाल्यावर WhatsApp संदेश प्राप्त होईल
🎯 संकल्पना लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब
🛡️ आयोजक आपला मावळा संघटना
🚩 चला तर मग! हजारो मावळ्यांच्या जयघोषात आपण सारे भेटूया चावंड किल्ल्यावर! इतिहासाशी नातं जोडूया, संस्कृतीचं रक्षण करूया! आम्ही येतो… तुम्ही या!!